Header Ads Widget

     गाईच हंबरण. . . .गुराख्यांच माळरानात गोरक्षण करण. . . . झडीपान्यापावासात राबण. . . . कडक, तमिल उन्हात होरपळून जान. . . . पायात भाराटाचा काटा बुडण.. भळाभळा रक्त येण. . . . उभ आयुष्य दुःखातच जगन. . . . संत तुकाराम महाराजांनी म्हटल्या प्रमाणे “सुख पहावे जवापाडे दुखः हे पर्वता एवढे” मानवी जीवनात सुख कमी आहे. पण दुखः हे पर्वताएवढे आहे. कळा सोसून गाडीची वारती होऊन आयुष्य ओढीत नेणारी माय मुक्ताई. . . . तिच्या पोटी असा हा हिरा उदयास आला. . . . त्या  हि-याने  “आनंदाचा होई आनंद तरंग. . . . आनंद भरीन तिन्ही लोका”. . . . असे कर्मयोगी क्रांतीसूर्य, जागतिक गुराखी साहित्य संमेलनाचे संकल्पक, श्री शिवाजी मोफत ऐज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व संस्थाचालक, माजी आमदार व माजी खासदार डॉ. भाई केशवरावजी धोंडगे साहेब होत.

डॉ. भाई केशवरावजी धोंडगे साहेब

डॉ. भाई केशवरावजी धोंडगे साहेब
(जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी आमदार व खासदार) 

    समाज सुधारणा घडून आणण्यासाठी डॉ. भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या प्रेरणेने प्रतिवर्षी अखिल विश्वातील गुराखी साहित्य संमेलन घेतले जाते. या गुराखी साहित्य संमेलनात वासुदेव, नाथगोसावी माकडवाले, मसणजोगी, अस्वलवाले, भोईराज, पोतराज, कुणबीराजा, बळीराजा, माळकरी, टाळकरी, वडर, उंटवाले, शिंगाडे, पोपटवाले, सर्कसवाले, गारुडी, कैकाडी, नंदीबैलवाले, गुराखीराजा आणि गुराखीमातांचा समावेश होतो.  गुराखी साहित्य संमेलनात पोतराज, माकडवाले, वासुदेव अश्या वेगवेगळया कलाकारांच्या कलागुनातून भारतीय प्राचीन संस्कृतीचा उत्साहाचा पूर वाहतो. सांस्कृतिक कार्यक्रमातून कलाकार आपापल्या कलागुणांचे दर्शन घडवतात.


कामाई चे मंदिर  

    संमेलनाच्या पहिल्या दिवशी भव्य मिरवणूक निघते.  कामाईच्या मंदिरात अध्यक्ष व उद्घाटकांच्या हस्ते पूजा होते आणि तिथून मिरवणुकीला सुरवात होते. विद्यार्थी वर्ग, लेझीम पथक डंबेल आनंदाच्या सोहळ्यात हिरहिरीने भाग घेत असतात. नाचत गात सर्वच या आनंदी सोहळ्यात गुराखी गडाकडे जातात. निसर्गरम्य अश्या ठिकाणी हा गुराखीगड असून त्या ठिकाणी डोंगराळ भागात उत्साहाचे वातावरण दिसून येते. 


गुराखीगडाकडे जाणारी कमान 

    या संमेलनाच्या व्यासपीठाला गुराखीपीठ असे संबोधले जाते. वाळुक, चिमणीचे खोपे, शिकाळे, मुंगुस, वांगी, गाजरे, बोरे, बिब्याच्या माळ्या, पपया, आंब्याची पाने, खारीक, खोबरे, कांद्याची पात आदी रानमेव्यांनी गुराखीपीठ सजविले जाते.  गुराखीपीठावर जागोजागी गुराखी ध्वज लावलेला असतो. गुराखीपिठावर दहीहंडी लोंबकळत ठेवलेली असते. गुराखीपिठावर अध्यक्ष, उद्घाटक, प्रमुख पाहुणे, गुराखी कलावंत यांच्यासह गुराखीपीठाच्या वर चिमणीचे खोपे, शिकाळे, वाळके, काकढ्या, लचकन, गोफणी, चाबूक, बिब्यांच्या माळा, गुंजांच्या माळा, पपया, आंब्यांच्या पानांची तोरणे, खारीक खोबऱ्याच्या माळा असतात.कार्यक्रमाची सुरवात वंदे मातरम या गीताने होते.

    गुराखी साहित्य संमेलनाची सुरवात १९९२ साली झाली. हे संमेलन नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यामध्ये कंधार रोडवर असलेल्या भव्य दिव्य अश्या गुराखी गडावर होते. 

गुराखी गडावरील चित्रफिती. . . . . .


जय क्रांती


विधानसभेत व्यक्त केलेला संकल्प 


सदगुरु निवृत्ती महाराज तेलंग यांची आरती 


दुध देणारा मोत्या बैल (समाधी)


कृष्ण मंदिर 


गुराखी गडावरील परिसर 


गुराखी गडावरील परिसर 


6 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा