प्रामाणिकपणा म्हणजे काय हो एखाद्या सोबत निष्ठेने राहणे, त्याच्याविषयी आपल्या मनात चांगली भावना ठेवणे, ज्याच्या सोबत प्रामाणिक आहोत त्याच भल करण्यासाठी आपण प्रार्थना करणे, जीव तोडून त्याच्या कार्यात त्याला मदत करण्यासाठी प्रयत्न करणे, कोणत्याही संकटात कुठलीही आणि कशीही परिस्थिती उद्भवली असता त्याच्या सोबत खांद्याला खांदा लाऊन उभे राहणे, त्याच दुखः आपलं दुःख समजून त्याच्या दुःखात सहभागी होणे. येवढं सगळं ह्या काळात आपल्यासाठी कोणी करत का आणि आपणही त्याच्यासोबत येवढेच प्रामाणिक आहोत का?
मलातर वाटत की बहुतांश लोक एकमेकांसोबत प्रामाणिक रहात नाहीत ती फक्त स्वार्थासाठी सोबत असतात. अशी फार क्वचित लोक आपल्याला पाहायला मिळतात जी एकमेकांसोबत प्रामाणिक आहेत. आपण कोणासोबत प्रामाणिक असलो तरी पुढचा आपल्यासोबत येवढाच प्रामाणिक आहे का आणि कोणी आपला सोबती, सखा आपल्या सोबत एवढा प्रामाणिक असेल तर आपण त्याच्यासोबत तेवढेच प्रामाणिक आहोत का त्याच उत्तर थोडा विचार करून आपण शोधलं पाहिजे.
जीवाला जीव देणारे सोबती, सुखदुःखात खांद्याला खांदा लावून राहणारे लोक अश्या बऱ्याच लोकांचं बारकाईन निरीक्षण केल्यास अस लक्षात आल की फार क्वचित लोक एकमेकांसोबत प्रामाणिक राहतात आणि बाकीच्यांच्या प्रामाणिकपणाच्या थापांमाघे फक्त स्वार्थ दिसतो.
एक सत्य उदाहरण आपल्या समोर मांडतो. . .
दोन मित्र जे नेहमी एकमेकांसोबत राहायचे दोघांची मैत्री म्हणजे अशी की त्यांच्या पासून दुसऱ्यांनी प्रेरणा घ्यावी, व्वा मित्र असावे तर असे, अक्षरशः बाकी मित्र त्यांच्या मैत्रीवर जळत असे, मनात विचार करत असे की आपला का असा कोणी मित्र नसेल. . . .
हे दोन्ही मित्र पण एकमेकांसोबच्या मैत्रीचा गाजावाजा खूप करत, पण जेंव्हा एक संकटात असताना दुसरा अंग काढून घेत होता दुसरा संकटात असताना पाहिला अंग काढून घेत होता त्यावेळेस अस निदर्शनात आल की त्यांची मैत्री दोन्ही बाजूने स्वार्थावर अवलंबून होती. एकाकडं बोलण्याची कला होती त्याच्या बोलण्यातून तो सर्वांचे मनोरंजन करत त्याच्यासोबत कोणीही असला तरी तो त्याला बोर नाही होऊ देत बोलून खुश करायचा आणि त्यासाठी दुसरा मित्र त्याच्या सोबत राहायचा. म्हणजे कसं आपला हा मित्र आपलं मनोरंजन करत राहील आपल्याला कंटाळा येऊ देणार नाही ह्या उद्देशाने तो त्याच्यासोबत नेहमी राहायचा. मनोरंजन करणारा दुसऱ्या मित्रासोबत राहण्याच कारण म्हणजे तो चांगल्या धनाढ्य घरातून होता. त्याला बाहेर थोडा खर्च करण्याची सवय म्हणून तो त्याच्यासोबत राहायचा एकमेकांसोबत फक्त हे स्वार्थापोटीच राहणंच आहे ना . . . .
आता ह्या मैत्रीमध्ये प्रामाणिकपणा नव्हता होता तो फक्त स्वार्थ मग आपल्या आजूबाजूला असलेले मित्र आपल्यासोबत खरंच प्रामाणिक आहेत का कोणत्या स्वार्थासाठी आपल्या सोबत राहतात ह्याची शहानिशा एकदा करून घ्या आणि एकच मित्र ठेवा पण प्रामाणिक ठेवा आणि स्वतःही त्याच्याशी प्रामाणिक रहा . . . .

टिप्पणी पोस्ट करा